Gemini अॅप म्हणजे एक AI असिस्टंट आहे. तुम्ही Gemini अॅपची निवड केल्यास, ते तुमच्या फोनवरील प्राथमिक असिस्टंट म्हणून Google Assistant ची जागा घेईल. Google Assistant वरील मीडिया आणि दिनक्रम नियंत्रित करणे अशी बोलून वापरता येणारी काही वैशिष्ट्ये अद्याप Gemini अॅपवर उपलब्ध नाहीत. तुम्ही सेटिंग्जमध्ये Google Assistant वर परत स्विच करू शकता.
Gemini अॅप फक्त २ GB किंवा त्यापेक्षा जास्त RAM असलेल्या आणि Android 10 आणि त्यापुढील आवृत्तीवर रन होणाऱ्या Android फोनवर उपलब्ध आहे.
हे अधिकृत अॅप विनामूल्य आहे. Gemini तुम्हाला तुमच्या फोनवर Google च्या सर्वोत्तम AI मॉडेलच्या फॅमिलीचा थेट अॅक्सेस देते, जेणेकरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- लिहिणे, विचारविनिमय करणे, शिकणे आणि आणखी बऱ्याच गोष्टींमध्ये मदत मिळवणे
- Gmail किंवा Google Drive मधील झटपट माहितीचा सारांश देणे किंवा ती शोधणे
- नवीन मार्गांनी मदत मिळवण्यासाठी मजकूर, आवाज, फोटो आणि तुमचा कॅमेरा वापरणे
- तुमच्या फोन स्क्रीनवर जे आहे त्याबाबत Gemini कडे मदत मागण्यासाठी “Ok Google” म्हणणे
- Google Maps आणि Google Flights वापरून योजना आखणे
तुम्हाला Gemini Advanced चा अॅक्सेस असल्यास, ते अगदी इथेच Gemini अॅपमध्ये उपलब्ध असेल.
Google Gemini मोबाइल अॅप हे निवडक स्थानांवर, भाषांमध्ये आणि डिव्हाइसवर रोल आउट होत आहे. उपलब्धतेबद्दल मदत केंद्रामध्ये अधिक जाणून घ्या:
https://support.google.com/?p=gemini_app_requirements_android
Gemini अॅप्स गोपनीयता नोटिसचे पुनरावलोकन करा:
https://support.google.com/gemini?p=privacy_notice